Marathi
mr
HomeContact UsFAQBlog

व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट कधी वापरायचे?

हॅलो मीशो उद्योजिका! व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट हे अनेक तज्ञ मीशो रिसेलरच्या विश्वासाला पात्र ठरलेले आणि रिसेलिंगसाठी खुपच उपयोगी असे फिचर आहे. काही ग्राहकांना ग्रुपवर असणे

आवडत नाही त्यापेक्षा तुम्ही वैयत्तिकरित्या प्रॉडक्ट पाठवले तर ते त्यांना जास्त आवडते. अशा ग्राहकांसाठी तुम्ही ब्रॉडकास्ट फिचर वापरू शकता. ब्रॉडकास्ट फिचर एकाच वेळी अनेक ग्राहकांना पोस्ट पाठवते, पण वैयत्तिकरित्या.

ब्रॉडकास्ट कसे बनवायचे?

 1. ब्रॉडकास्ट बनवायला, व्हॉट्सॲप स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर टॅप करा.  
 2.  इथे तुम्हाला, ज्या ग्राहकांनी त्यांच्या फोनवर तुमचा नंबर सेव्ह केला आहे तेच तुमचा ब्रॉडकास्ट मेसेज बघू शकतील असा मेसेज दिसेल. यासाठी, तुमच्या ग्राहकांना तुमचा नंबर सेव्ह करायला आवर्जून सांगा.
 3. आता ज्यांना ब्रॉडकास्ट पाठवायचा आहे असे कॉन्टॅक्ट निवडा. 
 4. तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार आहे आणि सेव्ह केली गेली आहे. लक्षात घ्या, हा ग्रूप नसून फक्त लिस्ट आहे. ग्राहकाची आवड निवड लक्षात घेऊन तुम्ही ब्रॉडकास्टची लिस्ट तयार करू शकता.
 5. आता व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवरून प्रॉडक्ट शेअर करायला, मीशो अ‍ॅपवर जा. 
 6. शेअर नाऊ' बटणावर क्लिक करून कॅटलॉग शेअर करा. 
 7. हे प्रॉडक्टची माहिती आपोआप कॉपी करेल.
 8. आता,ज्याला कॅटलॉग पाठवायचा आहे ती ब्रॉडकास्ट लिस्ट निवडा.
 9. 'सेंड' आयकॉनवर टॅप करा.
 10. तुम्हाला,तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना कॅटलॉगवरचे सगळे प्रॉडक्ट पाठवलेले दिसतील.
 11. आता प्रॉडक्टची माहिती कॉपी करायला मेसेज बॉक्सवर जास्त वेळ प्रेस करून ठेवा, आणि 'सेंड' टॅप करा.
 12. तुमच्या ग्राहकाला तुमचा प्रॉडक्ट वैयत्तिकरित्या शेअर केला गेला आहे.

ब्रॉडकास्ट फिचर वापरल्याने तुम्हा दोघांचा वेळ वाचतो आणि तुम्ही व्यक्तिश:अनेक ग्राहकांना प्रॉडक्ट विकू शकता. चला तर मग, या फिचरचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्या. हॅपी रिसेलिंग!