
2019
Paperback
201-300 Pages
Kajol : Katha Sangrah Book in Marathi, Baba Bhand
Motivational Books
Baba Bhand
9788177865813
1
Health, Family & Personal Development
Saket Prakashan Pvt Ltd
Marathi
India
Name : Kajol : Katha Sangrah Book in Marathi, Baba Bhand
Author : Baba Bhand
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
ISBN : 9788177865813
Language : Marathi
Pages : 201-300 Pages
Publish Year : 2019
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Sub Genre : Motivational Books
काजोळ' ही एका संस्कारक्षम संवेदनशील बालमनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. ते बालमन मानवी मनाचा विविधांगी तळ शोधू पाहते. या उत्कट बालमनाला संवेदनशीलतेचे धुमारे फुटू लागतात. नितळ, पारदर्शी, संस्कारशील बालमन आणि त्यावर उमटणारे जीवनानुभवाचे ठसे स्पंदनशील आणि सचेतन असतात. कोऱ्या पाटीसारखं असलेलं हे मन अनुभवाच्या अक्षरमुद्रा अधोरेखित करत जाते.
यात ग्रामपातळीवरील बेरकी, धूर्त, मतलबी संबंध, व्यसन-बाहेरख्यालीपणा या अपप्रवृत्ती, परस्परांतील हेव्या-दाव्यांचे, असूया-मत्सराचे प्रगटीकरण, मानवी जीवनातील काळ्याकुट्ट ढगांना आढळणारी सत्प्रवृत्तींची सोनेरी कडा, दुःखगर्भ अडचणीतही परिसाच्या हाताची मिळणारी मदत, गरिबी अन् दारिद्र्यानं पिडलेल्याचा शिकण्यासाठी चाललेला संघर्ष- हे सगळं जगण्याचा भाग म्हणून 'काजोळ'मध्ये आलंय.
कथानायकाची शिक्षणासाठीची धडपड, वास्तव कटु-कठोर जीवनानुभवाचं दर्शन, शाळासोबत्यांचा निर्मळ निर्व्याजपणा, प्रयणांकुराची अस्फुट चाहूल, तसेच साहसाची ऊर्मी इथं आहे.
लेखकाने खेड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून सांगितलेली रोमहर्षक व भावविभोर अशी ही कथा आहे. या अल्पशा प्रवासात भेटलेल्या असंख्य मित्र-मैत्रिणींच्या, शिक्षक-हितचिंतकांच्या लागेबांध्यांची, अतूट अशा भावबंधाची ही जणू प्रेमकहाणी आहे. लेखकाची बालमनाची समजही सूक्ष्म-सखोल आहे. बालमनाची हळवी कातरता, उदासीन हळुवारता आणि कोमल भावुकता ‘काजोळ'मध्ये सर्वत्र आढळते. यातील भाषा प्रसन्न आणि सुबोध आहे; तसेच तिला विलोभनीय डौल आणि सुखद गती आहे.
'काजोळ'चा रूपबंध कादंबरीसदृश असला, तरी त्याला प्रसन्न ललित गद्द्याचा घाट प्राप्त झाला आहे. तसेच गद्यलेखना
Country of Origin : India
More Information