
2016
Paperback
101-200 Pages
Socrates - Ek Thor Tattvavetta
True Accounts Books
Neeta Pandharipande
1
9788177868432
Biographies
Saket Prakashan Pvt Ltd
Marathi
India
Name : Socrates - Ek Thor Tattvavetta
Author : Neeta Pandharipande
Book Format : Paperback
Genre : Biographies
ISBN : 9788177868432
Language : Marathi
Pages : 101-200 Pages
Publish Year : 2016
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Sub Genre : True Accounts Books
सॉक्रेटिस... एक तत्त्ववेत्ता, नीतिमूल्यांना महत्त्व देणारा. संवादाला लोकशाहीचा आत्मा मानणारा, अन्यायास विरोध करणारा. नैतिक, अहिंसक आणि विवेकास चालना देणारा ज्ञानी माणूस. सॉक्रेटिसच्या योगदानाविषयी विचारवंत सिसोरो म्हणतो, ‘‘सॉक्रेटिसने तत्त्वज्ञान स्वर्गातून खाली आणले, नगरातून त्याची स्थापना केली. घरात त्यास प्रवेश दिला आणि मानवी जीवन, नीती, सदाचार, विवेक यांच्या परस्परसंबंधाची गरज प्रतिपादन केली.’’ सद्गुण, सद्विचार म्हणजे नेमके काय, नैतिकतेच्या पायावर जीवन समृद्ध करण्यासाठी नेमकं काय करता येईल, एक चांगला संस्कारित समाज निर्माण होण्यासाठी नेमकं काय करता येईल, त्यासाठी नेमक्या कुठल्या नैतिक मूल्यांची कास धरायला हवी, अशा मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्याचा सॉक्रेटिसने यशस्वी प्रयत्न केला. सॉक्रेटिसच्या या सर्व गोष्टी माणसाचे जीवन संपन्न करण्यास आजदेखील मदत करू शकतात, हे लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले आहे. हे पुस्तक जीवनाच्या विषम, कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी, अत्यंत कुशलतेने संकटांना सामोरे जाण्यासाठी उपयोगाचे ठरेल यात शंका नाही. धर्माची मीमांसा, सद्गुणांचे महत्त्व, शुद्ध आचरण, स्त्रियांचा सन्मान, सदाचार अशा अनेक घटकांनी युक्त असे सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान आजही अतिशय उपयुक्त ठरते. तसेच संतुष्टता म्हणजे सुख, आळसाचा कळस, आत्मज्ञानी, सर्वज्ञानी, अशा सॉक्रेटिसच्या बोधकथा आपल्याला चिंतन करायला लावतात. सॉक्रेटिसच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपण तशी वागणूक ठेवली, तर आपलेच नव्हे तर समाजाचे जीवनदेखील नंदनवन होऊ शकेल.
Country of Origin : India
More Information