
India
Name : Rajmata Jijau | राजमाता जिजाऊ मराठी चरित्र पुस्तक + Aai Hotana | आई होताना | Combo Set of 2 Marathi Printed Books
प्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे.
डॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक
पाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.
- डॉ. वृषाली किन्हाळकर
########################
एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक 'याची देही याची डोळा' पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.
स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच!
Country of Origin : India
More Information